आलियाला व्हायचेय सिद्धार्थच्या मुलांची आई

सध्या तरुणाईंमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचे चित्रपट, तिची स्टाईल स्टेटमेंट तसेच ड्रेसिंस सेन्समुळे लोकप्रिय आहे. 

Updated: Aug 14, 2016, 04:20 PM IST
आलियाला व्हायचेय सिद्धार्थच्या मुलांची आई title=

मुंबई : सध्या तरुणाईंमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचे चित्रपट, तिची स्टाईल स्टेटमेंट तसेच ड्रेसिंस सेन्समुळे लोकप्रिय आहे. 

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ मल्होत्राशी आलियाची चांगली मैत्री आहे. दोघे अनेकदा एकत्र दिसतात. त्यांच्या मैत्रीबद्दलच्या जोरदार चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगतायत. 

नुकत्याच एका मुलाखतीत आलियाने सिद्धार्थबद्दल अशी गोष्ट सांगितली की ज्यामुळे तिला सिद्धार्थ किती आवडतो हे स्पष्ट झालं. 

या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, जर पृथ्वीवर तु एकटी महिला आहेस आणि नव्या जीवाला जन्म द्यायचा असल्यास तु रणवीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, शाहीद कपूर आणि रणबीर कपूर यापैकी कोणाची निवड करशील? यावेळी आलियाने लगेचच सिद्धार्थ असे उत्तर दिले. 

आलिया सध्या अमेरिकेत होत असलेल्या ड्रीम टीम टूरमध्ये सहभागी होतेय. तसेच त्यानंतर ती वरुण धवनसोबत शुद्धी या चित्रपटात दिसणार आहे.