अक्षय कुमारचा लग्नातला फोटो व्हायरल

अभिनेता अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Updated: Aug 1, 2016, 06:41 PM IST
अक्षय कुमारचा लग्नातला फोटो व्हायरल  title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या 1959 मधल्या प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारनं पारसी व्यक्तीरेखा साकारली आहे. 

रुस्तमच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार वेगवेगळे फंडे अवलंबतो आहे. याचाच भाग म्हणून अक्षयनं त्याच्या पारसी सेक्रेटरीकडून तिच्या आई-वडिलांचा लग्नातला फोटोंचा अल्बम बघायला मागितला. हा फोटो बघितल्यानंतर अक्षयनं तसाच एक हुबेहुब फोटोही काढला. अक्षयचा हा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतो आहे.