एका सत्य घटनेवर आधारित आहे अक्षयचा 'रुस्तम' सिनेमा

बॉलिवूडच्या अॅक्शन स्टार अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'रुस्तम' सिनेमाचा पहिला डायलॉग प्रोमो शेअर केला आहे. हा डायलॉग प्रोमो अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

Updated: Jul 31, 2016, 02:44 PM IST
एका सत्य घटनेवर आधारित आहे अक्षयचा 'रुस्तम' सिनेमा title=

मुंबई : बॉलिवूडच्या अॅक्शन स्टार अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'रुस्तम' सिनेमाचा पहिला डायलॉग प्रोमो शेअर केला आहे. हा डायलॉग प्रोमो अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

सिनेमामध्ये अक्षयने नौदलाच्या अधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे. टीनू सुरेश देसाईचा हा सिनेमा १२ ऑगस्टला रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर ३० जूनला लॉन्च करण्यात आला होता.

सिनेमामध्ये अक्षय शिवाय अभिनेत्री इलियाना डिक्रूज देखील मुख्य भूमिकेत आहे. सिनेमा ज्या घटनेवर आधारित आहे. ज्याने संपूर्ण देशाला हादरुन टाकलं होतं. १९५९ मध्ये विवाहानंतरच्या संबंधांमुळे झालेल्या हत्यांची ही कथा आहे. या घटना देशभर चांगलीच गाजली.