प्रिन्स विल्यम-केट मिडलटनसाठी रॉयल भोजनाची तयारी!

ब्रिटनचा राजपूत्र प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन लवकरच भारतभेटीवर दाखल होणार आहेत. 

Updated: Apr 6, 2016, 12:53 PM IST
प्रिन्स विल्यम-केट मिडलटनसाठी रॉयल भोजनाची तयारी! title=

मुंबई : ब्रिटनचा राजपूत्र प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन लवकरच भारतभेटीवर दाखल होणार आहेत. 

ड्युक प्रिन्स विल्यम आणि डचेस केट मिडलटन यांची ही भारतभेट कायम आठवणीत राहावी, यासाठी खुद्द बॉलिवूडचा बादशाह आणि आंतरराष्ट्रीय स्टार ऐश्वर्या राय बच्चन सज्ज झालेत.

शाहरुख आणि ऐश्वर्या भारतात प्रिन्स विल्यम आणि केटचं स्वागत करणार आहेत. परदेशात शाहरुख आणि ऐश्वर्याची ख्याती आणि लोकप्रियता किती आहे, हे सांगायला नकोच.

प्रिन्स विल्यम आणि केटसाठी शाहरुख-ऐश्वर्यानं मुंबईत एका 'रॉयल डिनर'ची योजना आखलीय. ही पार्टी खूप खास असेल आणि त्यात काही मोजक्याच लोकांना प्रवेश मिळेल, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. या पार्टीत मोजक्याच बॉलिवूड, स्पोर्टस, राजकीय आणि व्यावसायिक लोकांचा समावेश असेल.

प्रिन्स विल्य आणि केट मुंबईतील ताजमहल हॉटेलला भेट देऊन २६/११ तील बळींना श्रद्धांजली वाहणार आहेत. यानंतर ते आग्र्यातील ताजमहललाही भेट देतील.