रितेश देशमुख पडला गटारात

रितेश देशमुखच्या बँजो चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे.

Updated: May 30, 2016, 05:25 PM IST
रितेश देशमुख पडला गटारात title=

मुंबई : रितेश देशमुखच्या बँजो चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. रितेश देशमुखनं हा टिझर ट्विटरवरून शेअर केला आहे. या टिझरच्या एन्ट्रीमध्येच रितेश देशमुख गटारातून बाहेर येताना दाखवला आहे, त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

बॅन्जो चित्रपटामधून मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे. या टिझरला अभिषेक बच्चननं आवाज दिला आहे. रवी जाधवच्या या चित्रपटामध्ये रितेश देशमुख आणि नर्गिस फाकरी मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे. 

मुंबईतल्या बँजो कलाकारांचं आयुष्य आणि त्यांचा स्ट्रगल यावर हा चित्रपट भाष्यं करणार आहे.

पाहा बॅन्जोचा टीझर