'लिंगम स्वामी'चं थोतांड ऋषी कपूर यांनी केलं उघड

बॉलिवूडमध्ये मोठ्या-मोठ्यांची ट्विटरवरून जर कुणी शाळा घेणारं असेल तर त्यांत सर्वात वरचा क्रमांक लागतो अभिनेते ऋषी कपूर यांचा... आपलं मत ठामपणे मांडणारे ऋषी कपूर कुणालाही सोडत नाहीत मग ते अमिताभ बच्चन असो, सोनाक्षी सिन्हा असो किंवा शोभा डे...

Updated: Sep 11, 2015, 04:26 PM IST
'लिंगम स्वामी'चं थोतांड ऋषी कपूर यांनी केलं उघड title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये मोठ्या-मोठ्यांची ट्विटरवरून जर कुणी शाळा घेणारं असेल तर त्यांत सर्वात वरचा क्रमांक लागतो अभिनेते ऋषी कपूर यांचा... आपलं मत ठामपणे मांडणारे ऋषी कपूर कुणालाही सोडत नाहीत मग ते अमिताभ बच्चन असो, सोनाक्षी सिन्हा असो किंवा शोभा डे...

आत्ताही ऋषी कपूर यांनी असाच एक फोटो ट्विट केलाय... हा फोटो खरा असेल तर तो तितकाच धक्कादायकही आहे. कारण, ऋषी कपूर यांनी यावेळी 'लिंगम स्वामी'चा फोटो शेअर केलाय. या फोटोत या लिंगम स्वामींचा एक भक्त स्वामींच्या 'लिंगा'चं दर्शन घेताना दिसतोय. 

'लिंगम स्वामी. हास्यास्पद... लोक इतके मूर्ख आहेत की दीर्घकाळ सेक्सचं सुख अनुभवता यावं यासाठी ते यांच्या प्रायव्हेट पार्टसचं दर्शन घेतात' असं ऋषी कपूर यांनी या फोटोसोबत ट्विट केलंय. 

ऋषी कपूर यांनी शेअर केलेल्या या फोटोला आत्तापर्यंत ६०० रिट्विट मिळालेत तर ५०० हून अधिक जणांना या ट्विटला फेव्हरेट करार दिलंय. 

ऋषी कपूर यांचे आत्तापर्यंतचे अनेक ट्विट हे अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांच्याविरुद्ध आहेत, हे विशेष.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.