मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा रोहित शेट्टीचा नवा सिनेमा 'सिंघम रिटर्न्स' एका नव्या वादात अडकलाय.
हिंदू जनजागृती समितीनं सेन्सॉर बोर्डाकडून या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केलीय. हिंदू जनजागृती समितीच्या म्हणण्यानुसार, सिनेमात हिंदू साधुंना नकारात्मक पद्धतीनं दाखवण्यात आलंय. ज्यामुळे हिंदूंच्या भावनांना धक्का लागतोय. हिंदू जनजागृती समितीचे सचिव रमेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सिंघम रिटर्न्स'च्या ट्रेलरमध्ये एका हिंदू साधूला व्हिलनच्या रुपात सादर करण्यात आलंय.
'जर सिनेमाच्या प्रोड्युसरनं हिंदू साधुंचा अपमान करणारे सीन काढल्याशिवाय हा सिनेमा प्रदर्शित केला तर या सिनेमावर आम्ही पूर्ण देशभर बंदी आणू' असं शिंदे यांनी म्हटलंय.
शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, 'एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार अभिनेता अजय देवगन संतांना मारण्याची भाषा करतो. पण, तो खाक्या ड्रेसमध्ये मस्जिदमध्ये जाऊन डोकं टेकवतो आणि मौलवीला सलाम करतो, अशी दृश्यं या सिनेमात दाखवण्यात आलीत. यामुळे हिंदू धर्माबाबत चुकीची धारणा लोकांत निर्माण होते' असंही हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.