पुन्हा एकदा प्रदर्शित होणार ऐश्वर्याच्या 'जज्बा'चा ट्रेलर!

अभिनेत्री ऐश्वर्या राय ही प्रदीर्घ काळानंतर 'जज्बा' या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये प्रवेश करतेय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आलाय. पण, या सिनेमाचा ट्रेलर पुन्हा एकदा नव्याने प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळतेय. 

Updated: Sep 2, 2015, 03:13 PM IST
पुन्हा एकदा प्रदर्शित होणार ऐश्वर्याच्या 'जज्बा'चा ट्रेलर! title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय ही प्रदीर्घ काळानंतर 'जज्बा' या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये प्रवेश करतेय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आलाय. पण, या सिनेमाचा ट्रेलर पुन्हा एकदा नव्याने प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळतेय. 

दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या  या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हिरव्या रंगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसतोय. त्याचमुळे हा ट्रेलर अनेकांच्या टीकेचा विषय बनतोय. बहुतेक प्रेक्षकांना हे 'हिरवट चित्र' पचनी पडलेलं दिसत नाहीय. 

अधिक वाचा - ट्रेलर: 'जज्बा'मधून ऐश्वर्याचं दमदार कमबॅक!

त्याचमुळे संजय गुप्ता यांनी याची कलर स्कीम बदलण्याचा निर्णय घेतलाय. हे काम पूर्ण झाल्यानंतर या आठवड्यात पुन्हा एकदा 'जज्बा' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येईल. 

'जज्बा' सिनेमाचं  जे व्हर्जन लोकांनी पाहिलं ते सिनेमाघरांसाठी बनवण्याात आलं होतं. मोठ्या पडद्यावर हा रंग पसरला जाईल... पण, टीव्ही, मोबाईल आणि इतर छोट्या स्क्रीनवर मात्र हा हिरवा रंग डोळ्यांना त्रासदायक ठरतो... त्यामुळे आम्ही हा ट्रेलर पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलाय, असं संजय गुप्ता यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.