अभिनेत्री रेखा कोणाच्या नावाने लावते कुंकू....ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

वयाची साठी पार केली असली तरी अभिनेत्री रेखाचे सौंदर्य मात्र अद्याप चिरतरुण आहे. आपल्या लाजवाब अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली बॉलीवूड अभिनेत्री रेखाच्या जीवनाशी संबंधित अद्याप अनेक रहस्ये कायम आहेत. यातील एक रहस्य म्हणजे रेखा कोणाच्या नावाचे कुंकू नेहमी लावातात. 

Updated: Feb 18, 2017, 08:56 AM IST
अभिनेत्री रेखा कोणाच्या नावाने लावते कुंकू....ऐकून तुम्हालाही धक्का बसेल title=

मुंबई : वयाची साठी पार केली असली तरी अभिनेत्री रेखाचे सौंदर्य मात्र अद्याप चिरतरुण आहे. आपल्या लाजवाब अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली बॉलीवूड अभिनेत्री रेखाच्या जीवनाशी संबंधित अद्याप अनेक रहस्ये कायम आहेत. यातील एक रहस्य म्हणजे रेखा कोणाच्या नावाचे कुंकू नेहमी लावातात. 

मीडिया रिपोर्टनुसार नुकताच यासिर ओसमान यांच्या पुस्तकात दिलेल्या रेखा आणि संजय दत्त यांच्या गुप्त लग्नाच्या खुलाश्याने बॉलीवूडमध्ये चांगलीच खळबळ उडालीये. 

यासिर यांचे पुस्तक “Rekha The Untold Story” नुसार १९८४मध्ये आलेल्या जमीन आसमान या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि संजय जवळ आले. सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. त्या दोघांनी गुपचूप लग्नही केले होते. ज्याची कोणालाच कल्पना नाहीये. 

संजय व्यतिरिक्त रेखा यांचे नाव अमिताभ यांच्याशी बऱ्याचदा जोडले गेलेय. मात्र अमिताभ यांच्या जीवनात जया आल्यानंतर रेखा एकट्या पडल्या.