पॉपकॉर्न पे महाचर्चा : भावना... मराठी सिनेमा... आणि बिझनेस!

'अदभूत' या यू ट्यूब चॅनलवर 'पॉपकॉर्न पे महाचर्चा' या कार्यक्रमात यावेळी अनेक दिग्गज एकत्र दिसत आहेत. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 17, 2016, 01:06 PM IST
पॉपकॉर्न पे महाचर्चा : भावना... मराठी सिनेमा... आणि बिझनेस! title=

मुंबई : 'अदभूत' या यू ट्यूब चॅनलवर 'पॉपकॉर्न पे महाचर्चा' या कार्यक्रमात यावेळी अनेक दिग्गज एकत्र दिसत आहेत. 

महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी ही दिग्गज मंडळी २०१६ सालात प्रेक्षकांसमोर आलेल्या अनेक सिनेमांबद्दल गप्पा मारताना या व्हिडिओत दिसत आहेत. 

नटसम्राट आणि सैराट हे दोन २०१६ या वर्षातले उल्लेखनीय सिनेमे... विशेष म्हणजे, या सिनेमांची निर्मिती 'झी' या बॅनरखाली झाली होती... या विषयांवर चर्चा नाही झाली तरच नवल... या निमित्तानंच मराठी सिनेमांशी भावनेनं जोडला गेलेला मराठी माणूस, मराठी सिनेमाकडून सगळ्याच प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि मराठी सिनेमाचा बिझनेस या विषयांवरही चर्चा झाली... या निमित्तानं २०१६ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी कसं ठरलं, असं या दिग्गजांना वाटतंय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल...