'रिअॅलिटी शो स्क्रीप्टेड नसतात'

 सध्या रिअॅलिटी शो चा जमाना आहे. प्रत्येक चॅनलवर रिअॅलिटी शो मोठ्या प्रमाणावर दाखवले जात आहेत.

Updated: Jun 5, 2016, 09:33 PM IST
'रिअॅलिटी शो स्क्रीप्टेड नसतात' title=

मुंबई : सध्या रिअॅलिटी शो चा जमाना आहे. प्रत्येक चॅनलवर रिअॅलिटी शो मोठ्या प्रमाणावर दाखवले जात आहेत. हे रिअॅलिटी शो स्क्रीप्टेड म्हणजेच आधीपासून ठरवलेले असतात असा आरोप कित्येक वेळा होता. 

या सगळ्या आरोपांवर आता रिअॅलिटी शो मध्ये काम केलेल्या सनी लिओनीनं उत्तर दिलं आहे. अनेक प्रेक्षकांना हे शो स्क्रीप्टेड वाटतात, पण तसं नसतं, काही प्रसंग आमच्यापुढे अचानक येतात आणि आम्हाला धक्का बसतो, मग त्याच्या हेडलाईन होतात, असं सनी म्हणाली आहे. 

स्प्लिट्सव्हिला हा आगामी रिअॅलिटी शो सनी लिओनी घेऊन येत आहे. या शोचं होस्टिंग सनी करणार आहे. ११ जुलैपासून हा शो सुरु होतं आहे. स्त्रियांची हुकूमत अशी या रिअॅलिटी शोची थीम असणार आहे. या शोमध्ये सहा तरुणी राजकन्यांच्या भूमिकेत तर त्यांना इम्प्रेस करण्यासाठी नऊ तरुण योद्ध्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.