...आणि रणवीर सिंग भररस्त्यात नाचायला लागला!

अभिनेता ह्रतिक रोशनकडून इतर स्टार्सना दिलं जाणारं ‘बँग बँग डेअर’ चॅलेंज सध्या बॉलिवूड वर्तुळात धूम उडवताना दिसतंय. याच, चॅलेंजच्या नादात अभिनेता रणवीर सिंग ट्राफीक असलेल्या रस्त्यावर उतरून भररस्त्यात नाचायला लागलाय. 

Updated: Sep 26, 2014, 04:28 PM IST
...आणि रणवीर सिंग भररस्त्यात नाचायला लागला! title=

मुंबई : अभिनेता ह्रतिक रोशनकडून इतर स्टार्सना दिलं जाणारं ‘बँग बँग डेअर’ चॅलेंज सध्या बॉलिवूड वर्तुळात धूम उडवताना दिसतंय. याच, चॅलेंजच्या नादात अभिनेता रणवीर सिंग ट्राफीक असलेल्या रस्त्यावर उतरून भररस्त्यात नाचायला लागलाय. 
 
ह्रतिकनं दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी रणवीर एक ट्रान्झिस्टर घेऊन गाडीतून उतरला आणि एका चौकात चक्क नाचायला लागला... यावेळी, तो ह्रतिकच्या ‘मैं ऐसा क्यू हूँ’ या गाण्यावर डान्स करत होता... आणि त्यानं ह्रतिकचा ‘कृष-3’चा मास्क तोंडावर लावला होता.

बघता-बघताच इथं गर्दीही जमली... रणवीरनं मास्क काढल्यानंतर सगळेच जण त्याच्याकडे केवळ आश्चर्याने पाहत राहिले.

पाहा, रनवीरचा हाच रस्त्यावरचा डान्स...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.