रणवीर-आलिया येणार एकत्र

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट लवकरच एका चित्रपटामध्ये एकत्र येणार आहेत.

Updated: Mar 24, 2016, 06:47 PM IST
रणवीर-आलिया येणार एकत्र title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट लवकरच एका चित्रपटामध्ये एकत्र येणार आहेत. दिग्दर्शक झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. मागच्याच वर्षी झोयानं रणवीरसोबत 'दिल धडकने दो' हा चित्रपट बनवला होता. आणि आता पुन्हा झोया रणवीर आणि आलियाला घेऊन नवा चित्रपट करणार असल्याच्या चर्चा आहेत. 

या चित्रपटासाठी रणवीरनं होकार दिला असल्याचंही बोललं जात आहेत. रणवीर सिंग सध्या आदित्य चोप्राच्या 'बेफिक्रे'च्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतरच झोया अख्तरच्या नव्या चित्रपटाचं शूटिंग सुरु होईल.