मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाने काही दिवसाआधी पाण्याच्या नासाळीवर एक ट्वीट केलं होतं, त्या ट्वीटची सोशल मीडियावर टर्र उडवण्यात आली. दिया मिर्झाने आपल्या ट्वीटबद्दल माफी मागितली आहे.
दियाने ट्वीट केलं होतं की, "विडंबन हे आहे की, आता आपण अशा स्थितीत आहोत, ज्यावेळी शेतकरी आत्महत्या करीत आहेत, आणि आपण अशा वेळी होळी खेळण्यासाठी पाणी वाया घालवत आहोत, आता जा आणि मला हिंदूविरोधी म्हणा", असं ट्वीट दिया मिर्झाने केलं.
यानंतर दिया मिर्झासमोर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, ट्वीटर युझर्सने दिया मिर्झाच्या चित्रपटाचे काही फोटो शेअर केले, ज्यात दिया मिर्झा पाण्यात अंघोळ करतेय, असे फोटो लावण्यात आले.
एकाने उपहासात्मक लिहिलंय की, "आमच्या वेळी वि़डंबन हे आहे की, ५० टक्के लोक, कपडे घेऊ शकत नाही, मात्र मी महागड्या डिझायनर कपड्यांमध्ये फिरणार, आता जा आणि मला भांडवलवादी म्हणा".
यावर दिया मिर्झाने आपल्या फेसबुक पेजवर भलंमोठं स्पष्टीकरण दिलं आहे, यात कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते असं दिया मिर्झाने म्हटलं आहे. नंतर दिया मिर्झाने आपलं हे ट्वीट परतही घेतलं आहे.
मात्र दिया मिर्झाने शेतकऱ्यांची बाजू मांडली यावर तिचं कुणीही कौतुक केलेलं नाही....