'जग्गा जासूस'च्या रिलीजची तारीख ठरली

रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या जग्गा जासूस चित्रपटाच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला आहे.

Updated: Aug 8, 2016, 06:57 PM IST
'जग्गा जासूस'च्या रिलीजची तारीख ठरली  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या जग्गा जासूस चित्रपटाच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला आहे. पुढच्या वर्षी सात एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे. अनुराग कश्यपचा हा चित्रपट रणबीर-कतरिनाच्या ब्रेक अपमुळे अडकल्याच्या चर्चा होत्या. अनुरागनं मात्र चित्रपटाच्या रिलीजला फक्त सहा महिने उशीर झाल्याचं म्हटल आहे. 

जग्गा जासूस रणबीर आणि अनुरागचं प्रॉडक्शन हाऊस 'शुरू प्रॉडक्शन'चा पहिलाच चित्रपट आहे. डिजनी या चित्रपटाचं सहनिर्माता आहे.