मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात नात्याची चर्चा जोरदार रंगलीये. समाज आणि मीडियामध्येही त्यांचे हे नाते लपून राहिलेले नाहीये. नुकताच या दोघांनी एकमेकांसोबत वेळही घालवला.
कतरिना सध्या तिच्या 'फितूर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. गेल्या मंगळवारी जेव्हा फिल्म सिटीमधून शूटिंग करुन परतली. तेव्हा रणबीरने तिचे वांद्रेच्या अपार्टमेंटमध्ये स्वागत केले.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रणबीर आपल्या खोलीच्या बाल्कनीत रात्री नऊ वाजल्यापासून बियर पीत होत. रात्री साडेदहाच्या सुमारास कतरिना तेथे आली. यावेळी दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. तसेच यादरम्यान किस करतानाचा दोघांचाही फोटो व्हायरल झालाय. फोटोत या दोघेही किस करत असल्याचा दावा करण्यात आलाय.