एक्स गर्लफ्रेंडनं सांगितलं, 'रणबीर कतरिनासोबत लग्न करणार नाही'

अनिल कपूरची लाडली सोनम कपूरनं सांगितलं की, तिला रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या प्रेमावर बिलकुलही विश्वास नाही. तिचं असं म्हणणं आहे की, जसे तीन खान स्क्रीन शेअर करत नाहीत,सलमान जसा लग्न करण्यास तयार नाही, तसंच रणबीर २०१५मध्ये कधीच कतरिनासोबत लग्न करू शकत नाही.

Updated: Dec 17, 2014, 08:15 PM IST
एक्स गर्लफ्रेंडनं सांगितलं, 'रणबीर कतरिनासोबत लग्न करणार नाही' title=

मुंबई: अनिल कपूरची लाडली सोनम कपूरनं सांगितलं की, तिला रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या प्रेमावर बिलकुलही विश्वास नाही. तिचं असं म्हणणं आहे की, जसे तीन खान स्क्रीन शेअर करत नाहीत,सलमान जसा लग्न करण्यास तयार नाही, तसंच रणबीर २०१५मध्ये कधीच कतरिनासोबत लग्न करू शकत नाही.

तसे, पाहता रणबीरसाठी सोनमच्या मनात हा निग्हेटिव्ह व्ह्यू असणं साहजिक आहे. कारण काही काळापूर्वी सोनम आणि रणबीरच्या सावंरिया दरम्यान रणबीरनं त्याच्या प्रेमाची जादू सोनमवरही केली होती. परंतु त्यानंतर दीपिकानं रणबीरच्या हृदयाचा ताबा घेतला आणि सोनम हताश झाली. काही महिन्यांपूर्वी ही मसक्कली जेव्हा करणच्या शोमध्ये गेली होती तेव्हा तिनं रणबीरला लग्न करण्याचं चॅलेंजदेखील दिलं होतं.

हल्लीच एका अॅवॉर्ड शो दरम्यान सोनमला रणबीर आणि कतरिनाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देखील सोनमनं त्यांचं लग्न कधीच होऊ शकत नाही, असं सांगितलं आहे. आता ही गोष्ट कधी आणि कितपत खरी ठरते हे येणाऱ्या २०१५ मध्येच स्पष्ट होईल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.