मुंबई : आपल्याला दाऊद सापडल्याचं दाऊदनं सोशल मीडियावर म्हटलंय... खुद्द दाऊदनं आपल्या आगामी सिनेमात काम करण्याची तयारी दाखवलीय, असंही ट्विट त्यानं केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात.
ट्विटरवरील आपल्या वादग्रस्त ट्वीट्समुळे नेहमी चर्चेत असणारी एक व्यक्ती म्हणजे निर्माता- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा... आपले विचार मांडण्यासाठी, आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी रामू सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत असतो. आताही त्याच्या अशाच ट्विटमुळे तो चर्चेत आला आहे.
रामूला दाऊद सापडला आहे हे खरं आहे... पण, खराखुरा दाऊद नाही तर रामूच्या आगामी 'गव्हर्न्मेंट' या चित्रपटासाठी त्याला दाऊद सापडलाय. या दाऊदचा एक फोटो त्याने ट्विटरवर शेअर केलाय. या फोटोतला 'दाऊद' अगदी हुबेहूब दाऊदसारखा दिेसतो.
I finally found an Actor to play Dawood Ibrahim in my new film "Government" pic.twitter.com/Ny2JUuJmcz
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 4, 2016
दाऊदनं आपल्या सिनेमात काम करण्याची तयारी दाखवलीय असं आपण खोटंच म्हटलं होतं... असंही मग रामूनं लगेचच जाहीर करून टाकलं.
I actually lied that he is an actor..Dawood Ibrahim himself has agreed to play a role in "Government" pic.twitter.com/TasyZZasET
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 4, 2016
हा अभिनेता कोण आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण, सरकारला अजून दाऊद सापडला नसला तरी दाऊदला शोधून काढण्यासाठी रामूचं अभिनंदन करायला हवं.
I was just lying that it's Dawood Ibrahim himself who is acting in "Government" pic.twitter.com/0xgyjr3xTP
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 4, 2016