चिकन खायच्या स्पर्धेत जिंकली प्रियांका

गेल्या काही दिवसांमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये चमकत आहे. 

Updated: Mar 4, 2016, 11:03 PM IST
चिकन खायच्या स्पर्धेत जिंकली प्रियांका title=

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये चमकत आहे. ऑस्करवारी, बेवॉच आणि जय गंगाजलच्या रिलीजनंतर पुन्हा एकदा प्रियांका चर्चेमध्ये आली आहे.

कॉमेडी सेंट्रलच्या 'द जिमी फॅलोन शो'मध्ये जाणारी प्रियांकाही पहिली भारतीय ठरली आहे. या शोमध्ये जिमी फॅलोननं प्रियांकाबरोबर चिकन खायची स्पर्धा लावली. या स्पर्धेमध्ये प्रियांकानं जिमीला हरवंल.

याच शोमध्ये प्रियांकानं जिमीला हिंदीही शिकवण्याचा प्रयत्न केला. नमस्ते कैसे हो इंडिया हे वाक्य प्रियांकानं त्याला शिकवलं.