सुपरस्टार रजनीकांत भाजपसोबत सुरू करणार राजकीय वाटचाल

तामिळनाडूत देवाप्रमाणे पुजला जाणारा सुपरस्टार रजनीकांतनं आपल्या राजकीय कारकिर्दीबाबतचा प्रश्न ‘देवाच्या इच्छेवर’ सोडून दिलाय. म्हणजे देवाची इच्छा असेल तर रजनीकांत राजकारणात उतरू शकेल. रजनीकांतनं असं म्हणताच, ते भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चांचं उधाण आलंय. 

Updated: Aug 26, 2014, 03:25 PM IST
सुपरस्टार रजनीकांत भाजपसोबत सुरू करणार राजकीय वाटचाल title=
फाईल फोटो

चेन्नई: तामिळनाडूत देवाप्रमाणे पुजला जाणारा सुपरस्टार रजनीकांतनं आपल्या राजकीय कारकिर्दीबाबतचा प्रश्न ‘देवाच्या इच्छेवर’ सोडून दिलाय. म्हणजे देवाची इच्छा असेल तर रजनीकांत राजकारणात उतरू शकेल. रजनीकांतनं असं म्हणताच, ते भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चांचं उधाण आलंय. 

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, रजनीकांतच्या वक्तव्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा रजनीकांतला तामिळानाडूतील भाजपचा चेहरा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची आणि रजनीही त्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय. 

दक्षिण भारतीय चित्रपटांच्या या महानायकाला जेव्हा त्याच्या राजकारणातील प्रवेशाबाबत विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी म्हटलं, ‘देवाची इच्छा असेल तेव्हा मी राजकारणात येईल’. त्यांच्या इच्छेबाबत विचारलं तर जी देवाची इच्छा तिच माझी, असं रजनीकांतनं सांगितलं. 

तामिळानाडूत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी रजनीकांत भाजपमध्ये येणार असल्याची अफवा खूप फायदेशीर ठरणार आहे. ही अफवा पसरताच तामिळानाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष टी. सौंदर्यराजन यांना दिवसातून कमीतकमी 7 हजार कार्यकर्त्यांना भेटावं लागतंय.
 
याबाबत सौंदर्यराजन यांनी सांगितलं की, “मला या बाबतीत पक्षाकडून कोणतीही ऑफिशिअल माहिती मिळाली नाही. रजनीकांत यांचा भाजपसोबत खूप मित्रत्वाचं नातं आहे. पूर्ण राज्याला माहितीय की, जेव्हा आमचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी नदी जोडण्याला महत्त्व दिलं होतं, तेव्हा रजनीकांत यांनी तात्काळ एक कोटी रुपयांची मदत केली होती”.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.