मुंबई : प्रत्यूषा बनर्जी आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राजने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. राहुलने पोलिसांना सांगितलं की प्रत्यूषा ही त्याच्याच मुलाची आई बनणार होती. जे.जे हॉस्पिटलने दिलेल्या रिपोर्टमध्ये 'बालिका वधू' या सिरीअलमधून झळकलेली प्रत्यूषा बनर्जी ३ महिन्यांपासून प्रेग्नेंट होती. पण नंतर तिने गर्भपात केला होता.
राहुलने पोलिसांना सांगितलं की, प्रत्यूषा आणि त्याने दोघांनी मिळून अबॉर्शनचा निर्णय घेतला होता. लग्न झाल्यानसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं राहुलने सांगितलं आहे. दोघेही लिव इन रिलेशनमध्ये राहत होते. भविष्याचा विचार करत आम्ही हा निर्णय घेतला आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही लग्न करणार होतो असं देखील त्याने जबाब दिला आहे.
प्रत्यूषाच्या आईने हायकोर्टात पिटीशन दाखल केला आहे. ज्यामध्ये प्रत्यूषाची हत्या झाल्याचं पोलिसांना सांगितलं असतांना देखील आत्महत्येची केस नोंदवली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची क्राईम ब्रँचने चौकशी करावी अशी देखील मागणी यामध्ये करण्यात आली आहे.