अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निर्मात्याला अटक

वांद्रा पोलिसांनी एका सिनेनिर्मात्याला अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. स्वत:ला सिनेनिर्माता असल्याचं सांगून याने अभिनेत्रीला एका मोठ्या सिनेमामध्ये काम देण्याचं आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.

Updated: Jul 5, 2016, 06:46 PM IST
अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या निर्मात्याला अटक title=

मुंबई : वांद्रा पोलिसांनी एका सिनेनिर्मात्याला अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. स्वत:ला सिनेनिर्माता असल्याचं सांगून याने अभिनेत्रीला एका मोठ्या सिनेमामध्ये काम देण्याचं आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.

मिड-डे या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ३२ वर्षाच्या या अभिनेत्रीने या निर्मात्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. खाण्यात गुंगीचं औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं या अभिनेत्रीने म्हटलं आहे.

रविवारी तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.