प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादूकोण दोघीही बॉलिवूू़डमधील आघाडीच्या अभिनेत्री. अव्वल स्थानावर असल्याने दोघीही एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी. मात्र असे असतानाही त्या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहे. याबातची कबुली खुद्द दीपिकानेचे दिलेय.
मुंबई :बॉलिवूड जगतात समोरच्यावर कुरघोडी करुन पुढे कसे जाता येईल याबाबत अभिनेत्रींमध्ये स्पर्धा सुरु असते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होणे ही दूरची गोष्ट. असे असतानाही प्रियंका आणि दीपिका एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
दोघींमधील केमिस्ट्री किती चांगली आहे हे 'पिंगा' या गाण्यातून दिसून येतेच. इतकेच नव्हे तर बॉलीवूड जगतात आपली सर्वात पहिली मैत्री झाली ती प्रियंकाशी अशी कबुली दीपिकाने दिली आहे. जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये प्रवेशही केला नव्हता तेव्हा मला प्रियंका भेटली. ती माझी बॉलीवूडमधील पहिली मैत्रीण आहे, असे दीपिकाने सांगितले.
यामुळेच की काय 'बाजीराव मस्तानी'च्या शुटिंगच्या वेळी प्रियंका आणि दीपिकाला कोणतीही अडचण आली नाही. आम्ही दोघीही चांगल्या मैत्रिणी असल्याने 'बाजीराव मस्तानी'च्या शुटिंगदरम्यान कोणतीही अडचण आली नाही, असेही दीपिकाने नमूद केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.