अभिनेता आमिर खानच्या कारने एकाला पाचगणीत ठोकले

मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या मर्सिडीज बेन्झ या गाडीला साता-याच्या पाचगणीत अपघात झाला. कारने बाईकस्वाराला ठोकरल्याने या अपघातात एक जण जखमी झाला.

Updated: Nov 21, 2015, 12:10 PM IST
अभिनेता आमिर खानच्या कारने एकाला पाचगणीत ठोकले title=

पाचगणी : मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या मर्सिडीज बेन्झ या गाडीला साता-याच्या पाचगणीत अपघात झाला. कारने बाईकस्वाराला ठोकरल्याने या अपघातात एक जण जखमी झाला.

या घटनेवेळी आमिर खान गाडीत नव्हता आणि अपघातही किरकोळ होता. शुक्रवारी दोन युवक दुचाकीवरुन पाचगणीवरुन खिंगर गावाकडे येत होते. त्यावेळी समोरुन आलेल्या मर्सिडीज बेन्झ आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. यात मनोज गोळे हा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मर्सिडीजमध्ये आमिरचा ड्रायव्हर आणि दोन बॉडीगार्ड असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी आमिरची मर्सिडीज ताब्यात घेतली. पाचगणी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. दरम्यान, शुटींगसाठी आलेल्या आमिरने रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपुस केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.