मुंबई : प्रियांकाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाउसमध्ये स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. प्रियांचे स्टार सध्या जोरात आहेत.
क्वांटिको या मालिकेमुळे प्रियांका जगभर पोचली आहे.
बॉलिवूडमध्ये मोठे यश संपादन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीचे नाव गाजते आहे. 2016च्या ऑस्कर सोहळ्यातही प्रियांकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
व्हाइट हाउस हे बिट कव्हर करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेतर्फे दरवर्षी मेजवानीचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा आणि त्यांच्या पत्नीसह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी हजेरी लावतात. या वेळी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्याची प्रथा आहे. या वर्षीच्या अंतिम यादीत प्रियांकाचे नाव असल्याचे सांगण्यात येते.