मुंबई : छेडछाडप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा जबाब नोंदविण्यात आलाय. वानखेडे स्टेडियमच्या आवारात तिला नेण्यात आले होते. बीसीसीआयच्या कार्यालयात प्रितीचा जबाब नोंदवण्यात आला.
प्रिती झिंटाच्या जबानीनंतर नेस वाडिया अडचणीत आहे. त्या ठिकाणी दोन साक्षीदार होते. धक्काबुकीच्यावेळी तिथे थोघेही उपस्थित होते, अशी पोलीस सूत्रांकडून माहीती देण्यात आलेय. विशेष म्हणजे पोलीस 30 मेच्या वानखेडेवर घडलेल्य़ा घटनेचं रिक्रिएशनही यावेळी करण्यात आलं. त्यावेळी ही माहिती पुढे आलेय.
एक्स बॉयफ्रेंड नेस वाडियानं छेड काढल्याची तक्रार प्रीती झिंटानं पोलिसांत नोंदवली होती. त्यानंतर ती परदेश दौऱ्यावर निघून गेल्यानं कारवाईत अडथळे निर्माण झाले होते. आता प्रीतीचा जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणातल्या कारवाईला गती येणार आहे. तसंच 30 मे रोजी नेमकं काय घडलं याचाही पर्दाफाश होणार आहे.
पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये आयपीएल सीओओ सुंदर रमण यांचा जबाब नोंदवला. तसचे बीसीसीआय सचिव संजय पटेल, मॅचच्या वेळी अनेक उपस्थित होते, त्यांचेही जबाब नोंदवले आहे.
पुढच्या आठवड्यात IPL चेअरमन रणजित बिस्वाल यांचा जबाब नोंदवणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.