राहुलची केस नाकारणाऱ्या वकिलाचे सात धक्कादायके खुलासे...

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यू प्रकरणात आता आरोपी राहुलच्या माजी वकिलानं धक्कादायक खुलासे केलेत. 

Updated: Apr 9, 2016, 10:33 AM IST
राहुलची केस नाकारणाऱ्या वकिलाचे सात धक्कादायके खुलासे...  title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यू प्रकरणात आता आरोपी राहुलच्या माजी वकिलानं धक्कादायक खुलासे केलेत. 

कोर्टानं राहुल राज सिंग याचा जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे, त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. याच दरम्यान, राहुलचे माजी वकील नीरज गुप्त यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक खुलासे केलेत. 

नीरजनं केलेल्या दाव्यांनुसार...

राहुल बेरोजगार होता... त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं. त्यानं ६ वर्षांपूर्वी एका भोजपुरी सिनेमात काम केलं होतं.

राहुलकडे त्याच्या स्वत:च्या खर्चासाठीही पैसे नव्हते. तरीही दररोज तो १५ ते २० हजार रुपये दारु आणि ड्रग्जमध्ये खर्च करत होता... हे पैसे कुठून येत होते?

प्रत्युषानं ज्या दिवशी आत्महत्या केली त्याच्या आदल्या रात्री (३१ मार्चला) राहुल एका मुलीसोबत बोरा बोरा रेस्टॉरन्टमध्ये पार्टी करण्यात दंग होता. त्याचं या मुलीशी भांडणही झालं. पार्टीत त्यानं भरपूर दारुही ढोसली होती. 

राहुल विवाहीत होता... तरीही तो मुलींना आपण अविवाहीत असल्याचं सांगत होता. २०११ साली त्याचं एअर होस्टेस असणाऱ्या सौगता मुखर्जी हिच्याशी झालंय. 

धक्कादायक म्हणजे राहुल आणि सौगता यांचा अद्याप कायदेशीर घटस्फोट झालेला नाही... आणि ही गोष्टही त्यानं प्रत्युषापासून लपवून ठेवली होती. 

राहुलनंच प्रत्युषाला ड्रग्ज घेण्याची सवय लावली होती. राहुल स्वत:ही ड्रग्जच्या आहारी गेलाय. नीरजच्या दाव्यानुसार, राहुल अगोदर मुलींशी मैत्री करत होता... त्यानंतर त्यांना ड्रग्जची सवय लावून तो आपले छंद पूर्ण करत होता... आणि मुलीकडचे पैसे संपल्यानंतर तो त्यांच्याशी ब्रेक अप करत होता... हीच राहुलची मोडस ऑपरेंडी होती. त्यानं प्रत्युषासोबतही हेच केलं. 

इतकंच नाही, तर ज्या दिवशी प्रत्युषा मृत आढळली त्यादिवशी सकाळी तिनं भरपूर मदय प्राशन केलं होतं... गळफास लावण्याच्या अगोदरही तिनं भरपूर दारु घेतली होती. इतकं नशेत असल्यानंतर शुद्धीत नसलेली कोणतीही व्यक्ती स्वत: गळफास कशी काय लावू शकेल? प्रत्युषाच्या नाकावर आणि गालांवर माराच्या खुणा होत्या...  असं म्हणत नीरज यांनी ही पूर्वनियोजित हत्या असल्याचं म्हटलंय.