इमरान हाशमीच्या 'अझहर'चं पहिलं गाणं प्रदर्शित

मुंबई : इमरान हाशमी सिनेमा म्हटला की त्यातली गाणी विसरुन चालणार नाही. 

Updated: Apr 9, 2016, 08:55 AM IST
इमरान हाशमीच्या 'अझहर'चं पहिलं गाणं प्रदर्शित    title=

मुंबई : इमरान हाशमी सिनेमा म्हटला की त्यातली गाणी विसरुन चालणार नाही. त्याच्या आगामी 'अझहर' या सिनेमाचं पहिलं गाणं नुकतंच लाँच झालंय. प्रेमाचा पुरेपूर भरणा असणारं हे गाणं त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री नरगीस फक्री या गाण्यात फारच रोमँटिक अंदाजात दिसतेय.   

'बोल दो ना जरा' असं या गाण्याचं नाव असून ते अरमान मलिकने गायलंय. तर अमाल मलिकने या गाण्याचं संगीत दिलंय. रश्मी विरागने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. 'अझहर' हा सिनेमा १३ मे ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.