'स्वत: ईदमध्ये सिनेमा आणतो आणि दुसऱ्यांना शरदमध्येही बिझनेस करू देत नाही'

'स्वत:चा सिनेमा ईदवर आणतो... आणि दुसऱ्यांच्या सिनेमाला शरद ऋतूमध्येही बिझनेस करू देत नाही...' असं ट्विट करत सलमान खानशी पंगा घेतलाय प्रियांका चोप्रा हिच्या एकेकाळच्या मॅनेजर प्रकाश जाजू यानं...

Updated: Oct 14, 2015, 06:20 PM IST
'स्वत: ईदमध्ये सिनेमा आणतो आणि दुसऱ्यांना शरदमध्येही बिझनेस करू देत नाही' title=

मुंबई : 'स्वत:चा सिनेमा ईदवर आणतो... आणि दुसऱ्यांच्या सिनेमाला शरद ऋतूमध्येही बिझनेस करू देत नाही...' असं ट्विट करत सलमान खानशी पंगा घेतलाय प्रियांका चोप्रा हिच्या एकेकाळच्या मॅनेजर प्रकाश जाजू यानं...

सध्या सुरू झालेल्या 'बिग बॉस'मुळे ऐश्वर्या राय - बच्चन हिचा कमबॅक सिनेमा असलेल्या 'जज्बा'ला फटका बसत असल्याचंही जाजू यानं म्हटलंय.

नुकत्याच सुरु झालेल्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन नऊ'मुळे ऐश्वर्याच्या जज्बा या सिनेमाच्या नाईट शोजची रेटींग घसरलीय... असं म्हणत जाजूनं सलमानला यासाठी जबाबदार ठरवलंय.

'बिग बॉसनं नाईट शोजच्या कलेक्शनची चांगलीच वाट लावलीय... थॅंक्यू सलमान खान... स्वत:चा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर आणतोस आणि दुसऱ्यांच्या सिनेमाला मात्र शरदमध्येही बिसनेस करू देत नाहीस... काल 'बिग बॉस9'मुळे हिंदी सिनेमांना जवळपास 4 करोडोंचा फटका बसलाय...' असं ट्विट जाजू यानं केलंय. 

ऐश्वर्या राय बच्चन हिचा कमबॅक सिनेमा 'जज्बा' नुकताच मोठ्या पडद्यावर झळकलाय. या सिनेमात इरफान खाननंही महत्त्वाची भूमिका निभावलीय. पहिल्या चार दिवसांत या सिनेमानं 17 करोड 35 लाखांचा गल्ला जमवलाय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.