लंडन: आर अँड बी स्टार रेहानाबद्दल वृत्तपत्रात एक बातमी आलीय की, ती दर आठवड्याला आपल्या सौंदर्यावर ३० लाख रुपये खर्च करते.
कॉन्ट्रॅक्ट म्युझिकच्या बातमीनुसार ‘डायमंड्स’पासून चर्चेत आलेली २६ वर्षीय गायिका अनेक सौंदर्य तज्ज्ञांकडून सेवा करते. ज्यात त्वचा तज्ज्ञ, ट्रेनर, डोळ्यांसंबंधी सौंदर्याशी निगडीत तंत्रज्ञांचा समावेश आहे. जेव्हा तिला त्यांची गरज असते, तेव्हा हे लोकं उपस्थित होतात.
एका सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, “डोळ्यासंबंधी सौंदर्याचे विशेषज्ञ २४ तास, ७ ही दिवस उपस्थित असतात. कारण रेहानाचं काही सांगता येत नाही, रात्री फिरायला निघाली तर ११ ही वाजता ती बोलवते. ती अनेक सौंदर्य प्रसाधनांचा आणि पद्धतींचा वापर करते. त्यात स्कीन टायटनिंग, ऑक्सिजन फेशियल, फोटो फेशियल आणि सर्वात खराब समजली जाणीर वॅम्पायर फेशियलचाही वापर करते.”
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.