नवी दिल्ली : नेहमीद वादात सापडलेली मॉडल शर्लिन चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ‘प्लेबॉय’ मॅगझीननं छापलेल्या तिच्या न्यूड फोटोंमुळे आता ही चर्चा सुरू झालीय.
महत्त्वाचं म्हणजे, स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आपले हे फोटो सार्वजनिक करून शर्लिननं आपला हा ‘पराक्रम’ जगासमोर आणलाय. यासोबतच, प्लेबॉय मॅगझिनमध्ये न्यूड फोटो देणारी पहिली भारतीय मॉडेलही शर्लिन ठरलीय.
एव्हढचं नाही तर, ‘प्लेबॉयसाठी मॅगझीनसाठी फोटो काढण्याचा माझा अनुभव माझ्या सगळ्यात शानदार अनुभवांपैकी एक आहे’ असं एका मुलाखतीदरम्यान शर्लिननं म्हटलंय.
‘मला या गोष्टीचा आनंद आहे की भारताच्या स्वातंत्र्यदिनी प्लेबॉयनं माझे हे फोटो जाहीर केलेत... माझ्यासाठी यापेक्षा सगळ्यात चांगली वेळ असूच शकत नाही’ असंही तिनं म्हटलंय.... आता बोला...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.