मोदींच्या 'स्वच्छ भारत' मोहिमेतील छोटा कार्यकर्ता... अबराम!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं नुकतंच आपल्या चिमुकल्या अबरामचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Updated: Apr 6, 2015, 12:45 PM IST

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं नुकतंच आपल्या चिमुकल्या अबरामचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

या फोटोमध्ये 2 वर्षांचा अबराम जमिनीवर झाडू मारताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'क्लिन इंडिया... ग्रीन इंडिया...' या मोहिमेत अबरामही सहभागी होतोय, असं यावेळी शाहरुखनं ट्विटवर म्हटलंय.

शाहरुखनं आपल्या चिमुकल्याच्या वाढत्या वयातले अनेक क्षण सोशल वेबसाईटद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलेत. गेल्या महिन्यातही शाहरुखनं अबरामचा एक फोटो शेअर केला होता यामध्ये अबरामच्या हातात एक पुस्तक होतं. 

अबरामचा जन्म 2013 साली सरोगसीच्या माध्यमातून झाला होता. अबरामशिवाय शाहरुखला आर्यन आणि सुहाना ही दोन मुलंही आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.