अनुष्काच्या 'फिल्लौरी'चा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड

प्रदर्शित होताच अनुष्का शर्माच्या 'फिल्लौरी' या सिनेमानं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Updated: Mar 25, 2017, 05:23 PM IST
अनुष्काच्या 'फिल्लौरी'चा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड  title=

मुंबई : प्रदर्शित होताच अनुष्का शर्माच्या 'फिल्लौरी' या सिनेमानं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

अनुष्काच्या होम प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा सिनेमा तयार झालाय. या सिनेमात अनुष्कासोबत दलजित दुसांझ याची महत्त्वाची भूमिका आहे. 

शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित झाला... आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं केवळ भारतातील बॉक्स ऑफिसवर तब्बल 4.2 करोड रुपयांची कमाई केलीय.

या सिनेमाच्या कमाईनं अनुष्का शर्माचा सिनेमा 'एनएच - 10' (3.35 करोड), विद्या बालनचा कहानी (3 करोड) आणि कंगना रानौतच्या 'तनु वेडस मनु' (3.2 करोड) या सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा रेकॉर्ड तोडलाय. 

उत्तर भारत खास करून पंजाबमध्ये या सिनेमानं मोठ्या प्रमाणात कमाई केलीय.