फक्त पुढचा एक महिना कपिल सोबत काम करणार सुनील ग्रोवर

कपिल शर्मा, त्याचा शो आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये आता काहीच आलबेल नाही. दिवसेंदिवस त्याच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. 

Intern Intern | Updated: Mar 25, 2017, 04:21 PM IST
फक्त पुढचा एक महिना कपिल सोबत काम करणार सुनील ग्रोवर title=

मुंबई : कपिल शर्मा, त्याचा शो आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये आता काहीच आलबेल नाही. दिवसेंदिवस त्याच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. अशातच कपिलसोबत काम करण्याची अजिबात इच्छा नसल्याचं सुनिल ग्रोवरनं स्पष्ट केलं असलं तरी त्याला पुढचा महिनाभर तरी शोमध्ये काम करावं लागणारच आहे.

सुनिल ग्रोवर आणि चॅनलचा असलेला व्यावसायिक करार पुढच्या महिन्यात संपणार आहे. करारानुसार तो हा शो इतक्यात सोडून जाऊ शकत नाही. त्याची इच्छा नसेल तरीही त्याला तिकडे काम करावंच लागेल.

म्हणजेच पुढचे काही एपिसोड तो आपल्याला डॉक्टर मशहूर गुलाटी आणि रिंकु भाभी म्हणून पाहायला मिळेल. त्यानंतर मशहूर गुलाटी कायमचा सुट्टीवर जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांतच नेमकं काय घडतं ते समजेलच.

वास्तविकत:  कपिलसोबत काम करण्यास त्याच्या सर्वच सहकलाकारांनी नकार दिल्याने त्याला एकही एपिसोड शुट करता येत नाही. अशातच चॅनलसह निर्मातेही या कलाकारांचा राग घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. मात्र कोणीच आपलं मन वळवायला तयार नसल्यानं शोचं पुढे काय होणार, ही चिंता द कपिल शर्मा शोच्या चाहत्यांना पडली आहे.