कृष्णावर चिडून 'कॉमेडी नाईटस'मधून आणखी एक चेहरा बाहेर

कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा 'कॉमेडी नाईटस् लाईव्ह' पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो कृष्णा अभिषेक याच्या मस्तीमुळे... 

Updated: Jul 15, 2016, 03:58 PM IST
कृष्णावर चिडून 'कॉमेडी नाईटस'मधून आणखी एक चेहरा बाहेर  title=

मुंबई : कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा 'कॉमेडी नाईटस् लाईव्ह' पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो कृष्णा अभिषेक याच्या मस्तीमुळे... 

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात काही दिवसांपासून दिसणाऱ्या ज्येष्ठ मराठमोळ्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. 


भारती आणि उषा नाडकर्णी

उल्लेखनीय म्हणजे, कृष्णा अभिषेक याच्यावर नाराज होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. 

कॉमेडी नाईटस लाईव्ह या कार्यक्रमाचं शुटींग सुरू असताना उषा नाडकर्णी यांनी मास्टर शॉटस दिले होते. पण, जेव्हा क्लोज शॉटस् घेण्याची वेळ आली तेव्हा कृष्णानं केलेली मस्करी त्यांना भावली नाही... आणि कृष्णावर नाराज होऊन त्या सेटवरून लगेचच निघून गेल्या. यानंतर त्यांनी हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतलाय.

पिंकी बुआ ही भूमिका पार पाडणाऱ्या उपासना सिंग हिनं नुकताच हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

उषा नाडकर्णी या लवकरच झी मराठी लवकरच सुरू होणाऱ्या 'खुलता खळी खुलेना' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.