रटाळ कॉमेडीपट 'ग्रेट ग्रँड मस्ती'

अभिनेता रितेश देशमुख, विवेक ऑबेरॉय, आफताब शिवदसानी स्टारर ग्रॅन्ड मस्तीचा आणखी एक सिक्वल अर्थातच 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती' आपल्या भेटीला आलाय. हा एक अडल्ट कॉमेडी सिनेमा आहे. 

Updated: Jul 15, 2016, 02:26 PM IST
रटाळ कॉमेडीपट 'ग्रेट ग्रँड मस्ती' title=

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख, विवेक ऑबेरॉय, आफताब शिवदसानी स्टारर ग्रॅन्ड मस्तीचा आणखी एक सिक्वल अर्थातच 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती' आपल्या भेटीला आलाय. हा एक अडल्ट कॉमेडी सिनेमा आहे. 

दिग्दर्शक ईन्द्र कुमार यांच्या मस्ती या सिरीजमधला हा आणखी एक सिक्वल ग्रेट ग्रॅन्ड मस्ती.. हा सिनेमा जरी आज सिल्वर स्क्रीनवर दाखल झाला असला तरी सिनेमा रिलीजच्या आधीच लीक झाल्यामुळे या सिनेमाच्या व्यवसायावर याचा किती फरक पडतो हे काही दिवसांनी कळेलच. 

रटाळ कथा

रितेश, आफताब आणि विवेक ओबेरॉय यांनी साकारलेल्या अमर, मीत आणि प्रेम या तीन पात्रांची ही गोष्ट आहे. हवसचे शिकार असलेल्या या तिघांना काही कारणांमुळे एका गावी जावं लागतं. इथे त्यांची भेट होते रागिनीसोबत. कोण आहे रागिनी? तिची भेट झाल्यानंतर काय घडतं अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे.

नवीन काहीच नाही

'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती' हा सिनेमा एक सेक्स कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमाची कथा असो,पटकथा असो, संवाद असो किंवा दिग्दर्शन, या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही नावीन्य पहायला मिळत नाही. या सिनेमातील फ्लॉप गोष्ट म्हणजे याचे स्क्रीप्ट

किती स्टार्स

ग्रेट ग्रॅन्ड मस्ती या सिनेमाला मी देतेय 2 स्टार्स.