अर्जुन कपूरला मलाईकापासून दूर राहण्याची बजावणी

यंदाच्या वर्षांत अनेक सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले... यापैंकीच एक जोडी म्हणजे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान... 

Updated: May 13, 2016, 02:27 PM IST
अर्जुन कपूरला मलाईकापासून दूर राहण्याची बजावणी title=

मुंबई : यंदाच्या वर्षांत अनेक सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले... यापैंकीच एक जोडी म्हणजे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान... 

दबंग सलमान खानच्या वहिणीनं अर्थात मलाईकानं सध्या आपल्या नावातून 'खान' हे नावही वगळलंय. यातच चर्चांणा आणखीन उधाण आलंय ते मलाईका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नातेसंबंधांवरून... 

सध्या पतीपासून वेगळ्या झालेल्या मलाईकापासून लांब राहण्याचा सल्ला वजा बजावणी अर्जुनला देण्यात आलीय. ही बजावणी दुसरं तिसरं कुणी दिली नसून त्याचेच वडील बोनी कपूर यांनी दिलीय. मलाईकापासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला चिंतीत वडिलांनी आपल्या मुलाला दिलाय. 

अर्जुनला बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी मदत करणारा सलमान खानच होता... अशात मलाईकासोबत संबंध ठेऊन 'भाईजान'शी पंगा न घेण्याचा सल्ला बोनी कपूर यांनी आपल्या मुलाला दिलाय.

उल्लेखनीय म्हणजे, त्यानंतर अर्जुन कपूरनंही त्यांचा हा सल्ला मानलेला दिसतोय... कारण गेल्या कित्येक दिवसांपासून हे दोघे एकत्र दिसलेले नाहीत.