पत्रकार चाँद नवाब यांना कराची स्टेशनवर मारहाण, सलमानने केली चौकशी

सलमान खानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान'मध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीनं ज्या रिपोर्टर चाँद नवाबची भूमिका साकारली. त्यांना आज पाकिस्तानात कराचीमध्ये रेल्वे स्टेशनवर मारहाण करण्यात आली. चाँद नवाब यांनी प्रसिद्धी मिळालेलं हेच कराचीचं रेल्वे स्टेशन आहे, जिथं आता त्यांना मारहाण झाली.

Updated: Sep 22, 2015, 07:37 PM IST
पत्रकार चाँद नवाब यांना कराची स्टेशनवर मारहाण, सलमानने केली चौकशी title=

कराची: सलमान खानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान'मध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीनं ज्या रिपोर्टर चाँद नवाबची भूमिका साकारली. त्यांना आज पाकिस्तानात कराचीमध्ये रेल्वे स्टेशनवर मारहाण करण्यात आली. चाँद नवाब यांनी प्रसिद्धी मिळालेलं हेच कराचीचं रेल्वे स्टेशन आहे, जिथं आता त्यांना मारहाण झाली.

आणखी वाचा - 'सलमान बजरंगी'ला पाकिस्तानी रिपोर्टरची जीव धोक्यात टाकून मदत

चाँद नवाब यांना मारहाण झाल्याची बातमी मिळताच अभिनेता सलमान खाननं त्यांना फोन केला आणि त्यांची चौकशी केली. सलमान खाननं केवळ त्याची चौकशीच केली नाही तर या मारहाणीचा निषेधही केला. सलमान म्हणाला, या घटनेनं चाँद नवाब यांच्या अनेक फॅन्सना वाईट वाटलंय.

चाँद नवाब यांनी या घटनेबद्दल माहिती देतांना सांगितलं की, बकरी ईद पूर्वी स्टेशनवर तिकीटांचं ब्लॅकमेलिंग सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. म्हणून ते त्याच्या रिपोर्टिंगसाठी तिथं गेले. चाँद नवाब म्हणाले, जशी सलमानला या घटनेची माहिती मिळाली त्यानं फोन करून चौकशी केली.

आणखी वाचा - चाँद नवाबचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

फक्त सलमान खानच नाही तर 'बजरंगी भाईजान'मध्ये चाँद नवाबची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी आणि दिग्दर्शक कबीर खान यांनीही चाँद नवाबला फोनकरून त्यांची चौकशी केली. चाँद नवाब हे पाकिस्तानात ९२ चॅनेलमध्ये काम करतात. चॅनेलनं सांगितलं या घटनेची माहिती पाकिस्तानचे रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफिक यांना दिली गेलीय. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.