सलमानसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार श्रीदेवीची मुलगी जान्हवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी नेहमीच चर्चेत असते. कधी रेड कार्पेटवर आपल्या लूकसाठी तर कधी ग्लॅमरस रुपासाठी ती ओळखली जाते. मात्र आता एक चांगली बातमी आहे. जान्हवी लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय.

Updated: Sep 22, 2015, 05:52 PM IST
सलमानसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार श्रीदेवीची मुलगी जान्हवी title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी नेहमीच चर्चेत असते. कधी रेड कार्पेटवर आपल्या लूकसाठी तर कधी ग्लॅमरस रुपासाठी ती ओळखली जाते. मात्र आता एक चांगली बातमी आहे. जान्हवी लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय.

आणखी वाचा - 'बाहुबली'ला टक्कर देणार विजय-श्रीदेवीचा 'पुली'

मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक राजमौली यांचे वडील के.वी.विजयेंद्र प्रसाद यांनी आपल्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी जान्हवी आणि सलमानला अप्रोच केलंय. हा चित्रपट मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये तयार होईल. केवी विजयेंद्र प्रसाद यांनी बाहुबली आणि बजरंगी भाईजान सारख्या सुपरहिट चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिलेली आहे. 

अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अजूनपर्यंत ना श्रीदेवीनं काही सांगितलं ना ही बोनी कपूर यांनी.

लवकरच श्रीदेवी तमिळ चित्रपट 'पुली'मध्ये महाराणीची भूमिका साकारतांना दिसेल. डी. सलमान हा तमिळ अभिनेता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.