पाकिस्तानात परतल्यावर फवाद खान म्हणतो...

बॉलिवूडमध्ये कमावल्यानंतर भीतीने भारतातून पळून गेलेल्या पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं अखेर गरळ ओकलीय. 

Updated: Sep 30, 2016, 04:33 PM IST
पाकिस्तानात परतल्यावर फवाद खान म्हणतो...  title=

नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये कमावल्यानंतर भीतीने भारतातून पळून गेलेल्या पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं अखेर गरळ ओकलीय. 

'माझ्यासाठी पाकिस्तान सर्वात पहिला... भारताच्या लोकांची मनं खूप छोटी आहेत' असं फवाद खाननं म्हटलंय. फवाद खानच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनाही यामुळे चांगलाच धक्का बसू शकतो. 

फवाद खान लवकरच दिग्दर्शक करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी करणही पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देताना दिसला होता.   
 
दरम्यान, आणखीन एक पाकिस्तानी कलाकार मार्क अन्वर यानंही पाकिस्तानचा उल्लेख 'हरामखोर' असा केलाय.