'बेबी डॉल' हे मूळचं गाणं पाकिस्तानातील मराठ्यांचं

सनी लिओनवर चित्रित करण्यात आलेलं 'बेबी डॉल' हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध गाणं मूळचं बलुचिस्तानमधील आहे,

Updated: Aug 16, 2016, 06:36 PM IST

मुंबई : सनी लिओनवर चित्रित करण्यात आलेलं 'बेबी डॉल' हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध गाणं मूळचं बलुचिस्तानमधील आहे, बलुचिस्तान हा प्रांत आता पाकिस्तानात आहे. या गाण्याचे गायक हे सब्ज अली बुगटी हे मराठा असल्याचं लेखक आनंद शिंदे यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय.

बलुचिस्तानमधील लोकांनी आपल्या स्वांतत्र्याचा लढा सुरूच ठेवला आहे, पाकिस्तानकडून त्यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं असा त्यांचा आरोप आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा विषय घेतल्य़ाने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे 'लवानी लला' हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा हे बलुची वाद्य वाजवण्यात मराठा कलाकार पारंगत आहेत.