गुलाबी आँखेवर सोनाक्षी झाली बेभान

बॉलिवूडमध्ये सध्या जुनी गाणी रिक्रिएट करण्याचा ट्रेंड आलाय. या ट्रेंडमध्ये आता आणखी एका गाण्याची भर पडली. सोनाक्षी सिन्हाच्या नूर या चित्रपटातील 'गुलाबी आंखे 2.0' हे नवीन गाणं रिलीज झालंय. 

Intern Intern | Updated: Mar 24, 2017, 07:30 PM IST
गुलाबी आँखेवर सोनाक्षी झाली बेभान title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या जुनी गाणी रिक्रिएट करण्याचा ट्रेंड आलाय. या ट्रेंडमध्ये आता आणखी एका गाण्याची भर पडली. सोनाक्षी सिन्हाच्या नूर या चित्रपटातील 'गुलाबी आंखे 2.0' हे नवीन गाणं रिलीज झालंय. 



१९७०च्या 'गुलाबी आँखे जो तेरी देखी' या गाण्याला अमाल मलिक या तरूण संगीत दिग्दर्शकाने सुंदररित्या रिक्रिएट केलंय. हे गाणं तुलसीकुमार, यश नार्वेकर आणि अमाल मलिक यां तिघांनी गायलं आहे.



याआधीही जुन्या गाण्यांचं नवं रुप म्हणून सादर झालेल्या 'लैला मैं लैला', 'तम्‍मा तम्‍मा', 'हम्मा-हम्मा' आणि 'तू चीज बड़ी है मस्त मस्त' या गाण्यांना चित्रपट प्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला. 



पहा सोनाक्षीच्या या नव्या गाण्याची एक झलक.

चित्रपटाचं दिग्दर्शन सुन्हील सिप्पींनी केलं आहे.  येत्या २१ एप्रिलला हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे.