मुंबई : पाकिस्तान कलाकारांचे कार्यक्रम देशात नको, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली. त्यानंतर पाक कलाकार पाकिस्तानात लपून-छपून गेलेत. तिकडे गेल्यानंतर भारताबद्दल वाईट मत व्यक्त केले. असे असताना आता अभिनेते ओम पुरींना पाकिस्तान कलाकारांचा पुळका आलेला दिसत आहे.
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. फवाद खान आणि माहीरा यांचे 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' चित्रपट प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले.
पाकिस्तानी कलाकारांना इथेच राहू देणं किंवा परत पाठवणे यामुळे फारसा काही फरक पडत नाही. मी सहा वेळा पाकला गेलो आहे. त्यांच्याकडून योग्य प्रेम आणि आदर मिळाला आहे, असेही पुरी म्हणालेत.
त्यानंतर सलमान खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवसी त्याने पाकिस्तान कलाकारांची बाजू घेतली. त्यानंतर त्याच्यावर सर्वच स्थरातून टीका झाली.
सलमान खान, करण जोहर, शाहरुख खाननंतर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ओम पुरी यांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलेला आहे. पाक कलाकारांकडे अधिकृत व्हिसा असून त्यांनी भारतात अवैध प्रवेश केलेला नाही, अशी भूमिका ओम पुरी यांनी एका टेलव्हिजनच्या टॉक शो दरम्यान घेतली.
पाकिस्तानी कलाकार हे अधिकृत वर्क व्हिसावरच भारतात काम करत आहेत. त्यामुळे अचानक त्यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या भारतीय निर्मात्यांनाच मोठा फटका बसणार आहे, असे ओम पुरी म्हणालेत.