'सैराटमुळे अन्याय झाला'

सैराट चित्रपटानं मराठीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अजूनही सैराट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक खेचतो आहे.

Updated: Jul 2, 2016, 09:35 PM IST
'सैराटमुळे अन्याय झाला' title=

मुंबई : सैराट चित्रपटानं मराठीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अजूनही सैराट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक खेचतो आहे. पण नुकताच रिलीज झालेला एक अलबेला चित्रपट मुंबईतल्या थिएटरमधून काढण्यात आला आहे. सैराट सिनेमामुळे एक अलबेला काढण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत.

एक अलबेला चित्रपटावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया अभिनेता मंगेश देसाईनं दिली आहे. एक अलबेला हा चित्रपट भगवान दादांवर आधारित आहे. या चित्रपटात मंगेश देसाई प्रमुख भूमिकेत आहे. विद्या बालननं या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये पदार्पण केलं आहे.