'नीरजा'नं सेट केला नफ्याचा धमाकेदार रेकॉर्ड...

अभिनेत्री सोनम कपूर हिचा 'नीरजा' हा सिनेमा २०१६ या वर्षातला आत्तापर्यंतचा दुसऱ्या नंबरचा हिट सिनेमा ठरलाय. इतकच नाही तर, या सिनेमानं नफ्याचा एक नवा रेकॉर्ड सेट केलाय.

Updated: Mar 16, 2016, 11:19 AM IST
'नीरजा'नं सेट केला नफ्याचा धमाकेदार रेकॉर्ड...  title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर हिचा 'नीरजा' हा सिनेमा २०१६ या वर्षातला आत्तापर्यंतचा दुसऱ्या नंबरचा हिट सिनेमा ठरलाय. इतकच नाही तर, या सिनेमानं नफ्याचा एक नवा रेकॉर्ड सेट केलाय.

१८ करोड रुपये गुंतवून बनवण्यात आलेला या सिनेमानं आत्तापर्यंत ७१.५० करोड रुपयांचा कमाई केलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटलं तर या सिनेमानं २०.६१ करोडहून जास्त कमाई केलीय. खासकरून कॅनडा आणि यूएईमध्ये नीरजाला चांगलाच प्रतिसाद मिळालाय.  

सिनेमाला हवी तशी ओपनिंग मिळाली नव्हती. तरीही या सिनेमाचं खूप कौतुक झालं. नीरजानं आत्तापर्यंत २४० टक्के नफा मिळवलाय. आता, 'नीरजा'नं सेट केलेला हा रेकॉर्ड यंदाच्या वर्षात कोण तोडणार याची उत्सुकता प्रेक्षकांनाही लागून राहिलीय.