सलमान खानच्या आयुष्यात आली नवी ऐश्वर्या

दबंग खान सलमान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन आज जीवनात जरी पुढे निघून गेले असले तरी दोघांच्या नावाच्या चर्चा आजही बॉलिवूडमध्ये रंगतात. ऐश्वर्या राय-बच्चन आता सलमानच्या लाईफमध्ये नसली तरी हे नाव त्याला काही सोडतांना दिसत नाही आहे.

Updated: Jun 14, 2016, 06:38 PM IST
सलमान खानच्या आयुष्यात आली नवी ऐश्वर्या title=

मुंबई : दबंग खान सलमान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन आज जीवनात जरी पुढे निघून गेले असले तरी दोघांच्या नावाच्या चर्चा आजही बॉलिवूडमध्ये रंगतात. ऐश्वर्या राय-बच्चन आता सलमानच्या लाईफमध्ये नसली तरी हे नाव त्याला काही सोडतांना दिसत नाही आहे.

सलमानच्या जीवनात आता एक नवी ऐश्वर्या आली आहे. जी सलमानसाठी काहीही करायला तयार आहे. ऐश्वर्या चौबे ही सलमानची खूप मोठी फॅन आहे. या ऐश्वर्याने सलमान खानला अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला. बजरंगी भाईजानच्या शूटिंग दरम्यान सलमानला भेटण्यासाठी ती काश्मीरला पोहोचली होती पण नाही भेटू शकली. अभिनेत्री ऐश्वर्या चौबेने दावा केला आहे की ती सलमानच्या आयुष्यातली नवी ऐश्वर्या आहे.

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या चौबेने अॅक्टर एजाज खानवर आरोप केले होते की, तो तिला अश्लील मॅसेज आणि न्यूड फोटो पाठवतो. पण यावर एजाज खानने म्हटलं होतं की तो फक्त हिला एकदाच भेटला होता. तो हिला ओळखत नाही.