भारताकडून यावेळी ऑस्करसाठी 'लायर्स डाईस'

भारताकडून यावेळी ऑस्करसाठी 'लायर्स डाईस' हा हिंदी चित्रपट पाठवला जाणार आहे. आपल्या पतीला शोधणाऱ्या एका आदिवासी महिलेची ही कहाणी आहे.

Updated: Sep 24, 2014, 04:44 PM IST
भारताकडून यावेळी ऑस्करसाठी 'लायर्स डाईस' title=

नवी दिल्ली : भारताकडून यावेळी ऑस्करसाठी 'लायर्स डाईस' हा हिंदी चित्रपट पाठवला जाणार आहे. आपल्या पतीला शोधणाऱ्या एका आदिवासी महिलेची ही कहाणी आहे.

'लायरस डायस' हा चित्रपट एक ड्रामा आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि गितांजली थापा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे निर्माते गीतू मोहनदास यांनी यापूर्वी काही मल्याळम चित्रपट बनवले आहेत.

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव सुपरन सेन यांनी सांगितलं की, भारताकडून हा चित्रपट बेस्ट फॉरेन चित्रपट या कॅटेगरीत निवडली गेली आहे.

हा चित्रपट 29 चित्रपटांना मागे टाकून पुढे गेला आहे. यात क्वीन, 2 स्टेटस, मेरी कॉम आणि यंगिस्तान सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय रजनीकांतची कौचेडियानसह तामिळ, मराठी, तेलुगू आणि कन्नड सारखे अनेक प्रादेशिक चित्रपट या शर्यतीत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.