नर्गिसचा मराठमोळा लूक

नर्गिस फाकरी नेसणार नऊवारी साडी... बसला ना तुम्हाला धक्का. मूळची अमेरिकेची असलेल्या नर्गिस बॉलिवूडमध्ये २०११ मध्ये एंन्ट्री केली. वेस्टर्न वरून नर्गिस चक्क आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

Updated: May 30, 2016, 02:37 PM IST
नर्गिसचा मराठमोळा  लूक title=

मुंबई : नर्गिस फाकरी नेसणार नऊवारी साडी... बसला ना तुम्हाला धक्का. मूळची अमेरिकेची असलेल्या नर्गिसने बॉलिवूडमध्ये २०११ मध्ये एंन्ट्री केली. वेस्टर्न वरून नर्गिस चक्क आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

बेंजो या आगामी चित्रपटात ती नऊवारी साडी नेसणार आहे. नर्गिससह सिनेमात रितेश देशमुखही प्रमुख भूमिकेत असणार आहे. यावेळी बॉलिवूडच्या चित्रपटात पहिल्यांदाच रितेश महाराष्ट्रीयन मुलाची भूमिका साकारणार आहे.

एका सीनमध्ये रितेश नर्गिसला नऊवारी साडीत स्वत:ची पत्नी म्हणून कल्पना करतो, त्या सीनमध्ये नर्गिस नऊवारीत दिसणार आहे.

नर्गिसची ही नऊवारी साडी दिव्या गंभीरने डिझाईन केली आहे. ही साडी नेसायला नर्गिसला चक्क २ तास लागले.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितले की, "मी माझ्या चित्रपटांमध्ये कायम एक मराठी अंदाज ठेवतो आणि तेच मी बेंजोमध्ये देखील केले. माझ्या मते प्रत्येकाला महाराष्ट्राची संस्कृती पहायला मिळाली पाहिजे. नर्गिस नऊवारी साडीत अतिशय मोहक आणि सुंदर दिसतेय."