मिका सिंगवर फॅशन डिझायनरचा विनयभंग केल्याचा गुन्हा

गायक मिका सिंग हा पुन्हा एकदा वादात अडकलाय. त्याच्यावर छेडछाड काढल्याचा आरोप फॅशन डिझायनरने केलाय. त्याच्यावर या महिलेच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Updated: Jul 5, 2016, 11:38 PM IST
मिका सिंगवर फॅशन डिझायनरचा विनयभंग केल्याचा गुन्हा title=

मुंबई : गायक मिका सिंग हा पुन्हा एकदा वादात अडकलाय. त्याच्यावर छेडछाड काढल्याचा आरोप फॅशन डिझायनरने केलाय. त्याच्यावर या महिलेच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

मिकावर विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलाय. दरम्यान, फॅशन डिझायनर महिला मिकाच्या ओळखीची असल्याचे सांगितले जात आहे. मिकाने तिला मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. या महिलेने मिकावर आरोप करताना म्हटलंय, मिकाने माझ्याशी गैरवर्तन केले आणि मला जखम केली.