मोंहंजोदडो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोंहंजोदडो चित्रपटाच्या विरोधातील याचिका फेटाळलीये. त्यामुळे बहुचर्चित मोंहोंजोदडो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय. 

Updated: Aug 9, 2016, 10:32 AM IST
मोंहंजोदडो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा title=

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोंहंजोदडो चित्रपटाच्या विरोधातील याचिका फेटाळलीये. त्यामुळे बहुचर्चित मोंहोंजोदडो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय. 

लेखक आकाश आदित्य लामा यांनी कॉपीराईट नुसार ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुरुवातीला आकाश यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधिश गौतम पटेल यांच्या सिंगल बेंच समोर दाखल केली होती. 

न्यायाधीशांनी या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर आकाश यांची याचिका फेटाळून लावली. पण नंतर पुन्हा आकाश यांनी मुंबई उच्च न्यायालयातीलच दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मोंहोंजोदडो चित्रपटाच्या स्क्रिप्ट वरील याचिका दाखल केली. 

त्यानुसार न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश अमजद सय्यद या दोन न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर दोन न्यायाधीशांच्या या बेंचने देखील आकाश यांची ही याचिका फेटाळली. त्यामुळे मोंहोंजोदडो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.